अर्थ : आट्यापाट्यांच्या खेळात क्रीडाक्षेत्रावर पाडलेल्या सुमारे बावीस फूट लांबीच्या आणि एक फूट रुंदीच्या आडव्या पट्ट्यांपैकी प्रत्येक.
उदाहरणे :
पाटी धरणारे सात गडी असतात.
अर्थ : लहान मुलांची लिहिण्याची फळी.
उदाहरणे :
त्याने पाटीवर मुळाक्षरे लिहून दाखवली.
अर्थ : एखाद्यी व्यक्ती, संस्था, दुकान इत्यादींचे नाव लिहिले आहे अशी लाकडी किंवा धातूची फळी.
उदाहरणे :
घराच्या दरवाज्यावर शैलेशच्या नावाची पाटी आहे.
समानार्थी : नामफलक
अर्थ : ज्यावर काही लिहिलेले असते असा लहान तक्ता.
उदाहरणे :
नाट्यगृहाबाहेर हाऊसफुल्लची पाटी लागली होती.
अर्थ : मुले जिच्यावर अक्षरे गिरवतात ती लाकडी फळी.
उदाहरणे :
तो खडू ने पाटीवर लिहित आहे.
अर्थ : काळ्या दगडाचा चौरस वा लंबोळका तुकडा.
उदाहरणे :
चित्रकार पाटीवर काही लिहित आहे.
पाटी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paatee samanarthi shabd in Marathi.